तटकरे बंधूमधील वाद संपवण्यासाठी शरद पवार सरसावले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद संपवण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावलेत. या दोघांनाही पवारांनी बारामतीला बोलावलं आहे.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद संपवण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावलेत. या दोघांनाही पवारांनी बारामतीला बोलावलं आहे.
दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आता पवारांनी शिष्टाई करण्याचं ठरवलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत अनिल तटकरेंनी पक्षाविरोधात काम केलं होतं. तसंच सुनील तटकरेंचा पुतण्याही शिवसेनेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या शिष्टाईला यश येणार का याकडे सा-यांच्या नजरा लागल्या आहेत.