पवारांची चौथी पिढी राजकारणात, रोहित पवार निवडणुकीच्या मैदानात
जिल्हा परिषद निवडणूकीच्या माध्यमातुन पवार कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात प्रवेश करतेय
बारामती : जिल्हा परिषद निवडणूकीच्या माध्यमातुन पवार कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात प्रवेश करतेय. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणूकीसाठी बारामतीतुन अर्ज दाखल केला.
रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत. अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांचे रोहित पुत्र आहेत. रोहित पवार यांनी अर्ज भरल्यामुळे यापुढे राज्याला आणखी एका नव्या काका पुतण्यांचं राजकारण पहायला मिळणार आहे.