बेळगाव : बारावीच्या परीक्षेत 97.58 टक्के गुण मिळवून शिला शहाजी केरळकर या विद्यार्थीनीनं घवघवीत यश मिळवलं आहे. आई-वडिलांचं छत्र हरपलेलं असतानाही तिनं कठोर परिश्रम आणि नियमित अभ्यास करून हे यश संपादित केलं आहे.


कोणतेही ट्युशन्स न लावता शिलानं फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत. आई-वडिलांनंतर तिचा सांभाळ तिच्या आजीनं केला. काबाड कष्ठ करून आजीनं तिचं शिक्षण पूर्ण केलं. घरात कुणीही शिकलेलं नसल्यामुळं तिला कुणाचंच मार्गदर्शन मिळालं नाही. मात्र आता तिला मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील काही व्यक्ती सरसावतांना दिसत आहेत. समाजसेविका डॉ. सोनाली सरनोबर यांनी तिला पुढील शिक्षणासाठी दहा हजार रुपयाची मदत केली. मात्र आजीच्या काबाडकष्टाचं नातीनं चीज केलं असचं म्हणावं लागेल.