नववर्षानिमित्त शिर्डी गर्दीनं गेलीय फुलून
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी कित्येकांना साथ हवीय साईबाबांची म्हणूनच त्यांनी गाठलंय शिर्डी... शिर्डी गर्दीनं फुलून गेलीय.
शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी कित्येकांना साथ हवीय साईबाबांची म्हणूनच त्यांनी गाठलंय शिर्डी... शिर्डी गर्दीनं फुलून गेलीय.
नाताळाची सुट्टी असल्याने २४ डिसेंबर पासूनच शिर्डीत भाविकांची गर्दी आहे. पदयात्री, पालख्या शिर्डीत दाखल होतायत. त्यामुळं रस्तेही गर्दीनं फुलून गेलेयत. कित्यकांनी नववर्षाचं स्वागतही साईंच्या साथीनं साजरं करण्यासाठी शिर्दीत मुक्काम ठोकलाय. नविन वर्ष सुख समृद्धीचं जावं अशी प्रार्थना करताना भाविक दिसतायत. ही गर्दी लक्षात घेता संस्थानकडून उपाय योजना करण्यात आल्यायत. 31 डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेता नव्यानं सुरु केलेल्या टाईम दर्शनचे पासेस वाढवण्यात आलेय. त्यासाठी काऊंटरची संख्या वाढवण्यात आलीय.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनानेही उपाययोजना केल्या आहेत.शिर्डीतील जड वाहतुक अन्य मार्गानं वळवण्यात आलीय. शिर्डीतील हॉटेल व्यसायिकांच्या दृष्टीने हा कालावधी अर्थकारणाला चालना देणारा असल्याने हॉटेल्स, लॉजेसलाही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गर्दीमुळे भाविकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने ऑनलाईन बुकींगवर भाविकांनी लक्ष केंद्रीत केल्याचं प्रकर्षानं जाणवतय. तर साईबाबा संस्थान भक्त निवासातही ऑनलाईन बुकींगमुळं रूम अगोदरच फुल्ल झाले आहेत.