शिर्डी, शेगाव संस्थानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँन्ड सिरीया म्हणजेच आयसीस या दहशतवादी संघटनेने धमकी दिलीय.
मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँन्ड सिरीया म्हणजेच आयसीस या दहशतवादी संघटनेने धमकी दिलीय.
शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, शिर्डी येथील साईबाबांचं मंदिर तसंच अमरावती, मलकापूर, भुसावळ आणि जळगाव येथील रेल्वे स्थानक बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी पत्रातून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर शेगाव येथील मंदिरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना ५ ऑगस्ट रोजी हे पत्र मिळालंय. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाला ही माहिती दिल्यानंतर सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.
धमकीच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, शिर्डीच्या साईमंदिराला वाढता धोका लक्षात घेता साई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी फोर्स वनची मागणी शिर्डीच्या विश्वस्त मंडळाने राज्य सरकारकडे केली आहे.