आता शिवसेनेचं `मी कर्जमुक्त होणार` अभियान
शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी हवी आहे आणि यासाठीच शिवसेना आता `मी कर्जमुक्त होणार` हे अभियान सुरु करणार आहे.
औरंगाबाद : शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी हवी आहे आणि यासाठीच शिवसेना आता 'मी कर्जमुक्त होणार' हे अभियान सुरु करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ही औरंगाबादेत घोषणा केली आहे. चार वर्षांनतर शिवसेनेन शिवसंपर्क अभियान सुरु केलेय. मराठवाड्य़ापासून केलेली ही सुरुवात राज्यभर विस्तारणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावरुन उद्धव ठाकरेंनी पुन्हा एल्गार फुंकलाय. मुख्यमंत्र्यासोबत शिवसेनेचेही आमदार दिल्लीला गेले होते. विधानसभेत लवकरच कर्जमुक्ती मिळेल असे आश्वासन मिळेल म्हणून आपण शांत होते. पण आता पेरण्या जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहे.
आता आरपारच्या लढाईसाठी शिवसेनेनं नवं अभियान सुरु केलय. यावेळी तूर, जीएसटी अशा अनेक विषयांवर उद्धव ठाकरेंनी सरकारला ख़डे बोल सुनावले आहेत.