सांगली : जिल्ह्यात हरोलीचे सरपंच आणि शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांची निघृण हत्या करण्यात आलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री एकच्या दरम्यान अंधारात पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात आणि मानेवर वार केल्याने ते जागीच ठार झाले. युवराज पाटील हे देशिंग येथून हरोलीतील आपल्या घरी गाडीनं जात होते. दरम्यान वसतीवरील घरासमोर गाडी लावून ते निघाले असताना अंधारात पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात व मानेवर वार केले.  


शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुका प्रमुख दिनकर पाटील यांचे ते बंधू होते.  पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे.