पुणे : पिंपरी-चिंचवडमधील राज्यस्तरीय अधिवेशनात आज भाजपने गुंड प्रवृत्तीचा फारूक शाहला पक्षात घेऊन पवित्र करुन घेतले. धुळ्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, स्थानिक आमदार अनिल गोटे यांचा काहींना विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने त्यांना प्रवेश दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळ्यातील काही नगरसेवकांचे भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत. त्यात राष्ट्रवादीचा फारूक शाह हा गुंड आहे. राष्ट्रवादीकडून उपमहापौरपद भुषवल्यानंतर तो आता भाजपमध्ये दाखल झालाय. राष्ट्रवादी आणि शिवसेना दे धक्का देताना भाजपने गुंडाला प्रवेश दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पाच नगरसेवकांनी आज राज्यस्तरीय अधिवेसनात भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या माजी उपमाहापौरासह माजी स्थायी समिती सभापती यांचा समावेश आहे. 


पुणे येथील भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष दानवे यांच्या उपस्थित त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे माजी सभापती विद्यमान नगरसेवक सोनल शिंदे, माजी उपमहापौर फारुक शाह, नगरसेविका रश्मी बानो, तसेच शिवसेनेच्या नगरसेविका शकूंतला जाधव, अपक्ष नगरसेवक फिरोज लाला यांनी प्रवेश केलाय. स्थानीक आमदार अनिल गोटे यांचा विरोध असताना भाजपने प्रवेश करुन घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.