ठाणे : नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला ठाण्यातला गुंड मयूर शिंदे आणि त्याच्या सहका-यांनी शिवसेनेच्या शाखासंघटक संध्या चिंदरकर यांना मारहाण केली. शनिवारी रात्री ही मारहाण करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बातमी कळताच खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं. 


मयूर शिंदे, आणि त्याच्या गुंडांना त्वरित अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.