मुंबई : निवडूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कोकणातदेखील तीन जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्यात भाजपचे वारे वाहत असले तरी कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला येथे अच्छे दिन येण्याची शक्यता कमी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. शिवसेनाचा कोकण हा बालेकिल्ला आहे. रायगडात शिवसेनेला बस्तान बसविण्यात आलेले नाही. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात सेनेच्या ताब्यात जिल्हा परिषद आणि अनेक पंचायत समित्या आहेत. 


सिंधुदुर्गात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चुरस आहे. मात्र, तिन्ही जिल्ह्याचा विचार करता भाजपला या ठिकाणी मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजपचे अस्तित्व केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. सध्याचे चित्र पाहाता सर्वच राजीकय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे