मुंबई : जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना गुलाबराव पाटील यांनी अंगावर घेतले होते. त्यांना थेट आव्हान दिले. उत्तर महाराष्ट्रात खडसे यांना शह देणारा शिवसेनेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे.

जळगाव ग्रामीणमधून निवडून आलेले ते खंबीर नेतृत्व आहे. त्यांना मंत्रीपद मिळावी अशी अनेक शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी होती. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला मंत्रीपद लाभले नव्हते. ते गुलाबराव पाटील यांच्या निमित्ताने देण्यात आले आहे. ग्रामीण भागात गुलाबराव पाटील यांचे काम चांगले आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेची ही खेळी आहे. त्यातच शिवसेना संपवायला निघालेल्या एकनाथ खडसे यांनी त्यांनी चांगला शह दिला. युती तोडण्यास खडसे कारणीभूत असल्याने त्यांचा एकप्रकारे शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला मंत्रीपद देऊन आपली ताकद वाढविण्याची संधी मिळाली, या संधीचे सोने करण्यासाठी व्युहरचना असल्याचे म्हटले जात आहे.