डॉ. दीपक सावंतांचं पद काढून घेण्याची शिवसैनिकांची मागणी
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे असणारे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणी खुद्द जिल्ह्यातील शिवसैनिकांनीच केल्याने खळबळ माजली आहे. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपद दिल्यानंतर प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अधिकारीराज सुरू असल्याचे आरोप करीत त्यांना तातडीने हटवून शिवसेनेचाच दुसरा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उस्मानाबाद : आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे असणारे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणी खुद्द जिल्ह्यातील शिवसैनिकांनीच केल्याने खळबळ माजली आहे. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपद दिल्यानंतर प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अधिकारीराज सुरू असल्याचे आरोप करीत त्यांना तातडीने हटवून शिवसेनेचाच दुसरा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कळंब आणि वाशी तालुक्यातील तब्बल ११२ शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत लेखी विनंती केली आहे. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना कमकुवत होत असल्याचे सांगत सर्वसामान्य जनतेची आणि शिवसैनिकांचीसुद्धा कामे होत नसल्याची खंत या निवेदनात करण्यात आली आहे.