मुंबई: श्रीहरी अणेंनी वेगळ्या मराठवाड्याच्या वक्तव्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. जोपर्यंत श्रीहरी अणेंवर कारवाई होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ बैठक आणि दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थिती लावणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर अणेंच्या राजीनाम्याच्या मागणीचे पडसाद विधीमंडळातही उमटले. अणेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आणि सत्तेतली शिवसेना सरसावली. 


श्रीहरी अणेंच्या या वक्तव्यामुळे राज्य सरकार चांगलच अडचणीत आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र या प्रकरणी मौन बाळगलंय. त्यामुळे श्रीहरी अणेंवर कारवाई होणार का नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.