यवतमाळ : निवडणुकीच्या काळात कुणाचा आपल्या जीभेवरचा ताबा कधी सुटेल हे सांगता येत नाही... असंच घडलंय शिवसेना विधानपरिषद आमदार तानाजी सावंत यांच्या बाबतीत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आमदार महाशय 'अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची' स्वप्न पाहत आहेत. त्यांच्या या वाचाळ बडबडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसतोय. 


'मी सव्वाशे - दीडशे कोटींचा कारखाना चालत चालत खरेदी करेन... मला कोणतीही अडचण येणार नाही... काही लोकांचा गैरसमज झाला असेल तानाजी सावंत भिकारी-बिकारी झालाय? मी अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण स्वत: भिकारी होणार नाही' असं बडबडताना सावंत या व्हिडिओत दिसत आहेत.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा तानाजी सावंत यांनी एका जाहीर सभेत बोलताना हे वक्तव्य केलंय. 


उल्लेखनीय म्हणजे,  ११५ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर करणारे तानाजी सावंत हे 'लक्ष्मीपुत्र' म्हणून ओळखले जातात.