मुंबई : शिवसेनेच्या विधीमंडळ प्रतोद आणि मंत्र्यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत भाजपसह शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे पालकमंत्री आपल्याच पक्षाच्या आमदारांची कामं करत नसल्याचा सूर आमदारांनी यावेळी लावला. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली. सरकारमध्ये असूनही कामं होत नसल्यामुळं शिवसेना आमदार नाराज आहेत.