मुंबई : शासकीय कार्यालयमधून देवादिकांचे फोटो काढण्याच्या परीपत्रकामुळे शिवसेना नाराज झाली आहे, त्यामुळे भाजपावर टीका करायला उद्धव ठाकरे यांना नवा मुद्दा मिळालाय. उद्याच्या भाषणात उद्धव ठाकरे हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2002मध्ये आघाडी सरकारनं पहिल्यांदा हे परिपत्रक काढलं होतं, पण त्याच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार फारसं आग्रही नव्हतं. आता भाजपा सरकारनं मंत्रालयातील धार्मिक फोटोना हद्दपार करत भावनेला हात घातलाय.


जे आघाडी सरकारला जमलं नाही ते हिंदुत्ववादी सरकारनं केल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनमध्ये नाराजी आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना या मुद्द्याचा भाजपाविरुद्ध पुरेपुर वापर करण्याची शक्यता आहे.