पुणे : मी जे बोलते ते थेट असतं, आणि मी लोकांची भावनाच बोलते, असं वक्तव्य लेखिका शोभा डे यांनी केलं आहे. ताली आणि गालीसाठी मी बोलत नाही, मी सनसनाटीही निर्माण करत नाही. माझं व्यक्तीमत्व प्रसिद्धी मिळावी असंच आहे, असंही शोभा डे म्हणाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमधल्या कार्यक्रमात शोभा डे यांनी हे वक्तव्य केलं आहे. भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंविषयी केलेल्या ट्विटमुळे शोभा डे यांच्यावर जोरदार टीका झाली होती. अमिताभ बच्चन यांच्यापासून वीरेंद्र सेहवाग यांनीही शोभा डेंना यावरून लक्ष्य केलं होतं.