बीड : मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती नसतांनाही  शेतकरी आत्महत्या सुरुच असल्याचं चित्र दिसत आहे. सरासरी रोज दोन शेतकरी मराठवाड्यात आत्महत्या करत आहेत. नवीन वर्षांच्या पहिल्या 58 दिवसांत शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा 117 पर्यंत पोहोचला आहे. यात सर्वाधिक 23 आत्महत्या बीडमध्ये झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षीही मराठवाड्यात 1053 आत्महत्या झाल्या होत्या. मराठवाड्यात गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला त्यामुळं चागलं पीक येणार अशी अवस्था होती, मात्र मोठा पाऊस झाल्यानं अनेक भागात शेतीचं नुकसान झालं. त्यामुळे सुद्धा आत्महत्या होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


दरम्यान प्रशासन आणि सरकार शेतक-यांच्या आत्महत्या थोपवण्यात कमी पडत असल्याचंच हे चित्र म्हणावं लागेल. कर्जमाफी झाल्याशिवाय शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, अशी प्रतिक्रीया विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.