पक्षाच्या पहिल्याच आंदोलनाला श्रीहरी अणेंची दांडी
राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आंदोलन करत, विदर्भ राज्य आघाडीने आज नागपूर कराराची होळी केली.
नागपूर : राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आंदोलन करत, विदर्भ राज्य आघाडीने आज नागपूर कराराची होळी केली.
संविधान चौकात विदर्भ कराराची ही होळी करण्यात आली. नागपूर कराराला आज 63 वर्षे पूर्ण होत आहेत. पण या कारारातली एकही अट पाळली गेली नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.
श्रीहरी अणे यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर होत असलेले हे पहिलेच आंदोलन असले तरीही याला अणे मात्र उपस्थित नव्हते.