स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी - श्रीहरी अणे
स्वतंत्र विदर्भाबरोबरच मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी, असं मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलंय. विदर्भा प्रमाणेच मराठवाड्यावर देखील अन्याय झाला असून मराठवाडा आणि विदर्भाच दुखः सारखेच असल्याने विदर्भाच्या राज्यनिर्मितीबरोबर मराठवाडा राज्याचीही निर्मिती व्हायला हवी असे स्पष्ट मत अणे यांनी जालना येथे व्यक्त केलंय.
जालना : स्वतंत्र विदर्भाबरोबरच मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी, असं मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलंय. विदर्भा प्रमाणेच मराठवाड्यावर देखील अन्याय झाला असून मराठवाडा आणि विदर्भाच दुखः सारखेच असल्याने विदर्भाच्या राज्यनिर्मितीबरोबर मराठवाडा राज्याचीही निर्मिती व्हायला हवी असे स्पष्ट मत अणे यांनी जालना येथे व्यक्त केलंय.
मराठवाडा राज्य निर्मिती साठी स्थापन झालेल्या मराठवाडा मुक्ती मोर्चा पक्षाच्या वतीन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना अणे यांच्या हस्ते साडी-चोळीचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यानिर्मितीचा निर्णय राज्याच्या नव्हे तर केंद्राच्या हातात आहे. राज्य निर्मितीसाठी केंद्र सरकारवरच दबाव आणावा लागेल, असे स्पष्ट करून विदर्भा प्रमाणेच मराठवाड्यातील जनतेने देखील यासाठी व्यापक लढा उभारावा, असे आवाहन त्यांनी केलंय.