नागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापला आहे. अणेंनी त्यांच्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या नकाशातून विदर्भ वेगळा कापला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अणेंनी असं करून राज ठाकरेंसह संयुक्त महाराष्ट्रावर कायम असणाऱ्या लोकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे.


आपण हे राज ठाकरेंना दाखवण्यासाठी हा केक कापत आहोत. तसेच आपण याच पद्धतीने चळवळ सुरू ठेवू असं यावेळी अणेंनी म्हटले आहे. यापूर्वी वेगळ्या मराठवाड्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अणेंना महाधिवक्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


केक सारखे अणे यांना देखील कापले पाहिजे. अणेंना चोपूनच काढले पहिजे. मनसे अणेंना आपल्या स्टाईलने उत्तर देईल, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे गटनेता संदिप देशपांडे यांनी दिली आहे
 
अणेंच्या या कृतीवर शिवसेनाही संताप झाला आहे. हिम्मत असेल तर अणेंनी गुजरातचा असा केक कापून दाखवावा? असा टोला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी लगावला आहे.