उमेदवार श्रुती वाघमारे यांचा अॅपच्या माध्यमातून डिजिटल प्रचार
डिजिटल प्रचार सुरु
नागपूर : सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहतायत. इच्छुक उमेदवारही आपापल्या पद्धतीने प्रचाराला लागले आहेत. पण काही उमेदवार कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहण्यासाठी डिजिटल झाले आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार श्रुती वाघमारे यांनीही डिजिटल प्रचार सुरु केला आहे.
काळ बदलत गेला आणि निवडणुकीच्या प्रचारातही वेगवेगळे फंडे वापरले जाऊ लागले. तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. नागपुरातल्या श्रुती वाघमारे यांनीही पालिका निवडणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यांची उमेदवारी अजुनही पक्की नाही पण तरीही त्या प्रचारात गुंतल्य़ा आहेत. अँड्रॉईड स्मार्ट फोनवर चालणारं ऍप त्यांनी तयार केलं आहे. युवक काँग्रेस प्रभाग 31 या नावाचं हे अॅप आहे. डिजिटल माध्यमातून प्रचार करून त्या उमेदवारी पक्की करण्य़ाचा प्रयत्न करत आहेत.
श्रुती वाघमारे या शिक्षिका आहेत. प्रभाग क्रमांक 31 मधून त्यांनी दावेदारी ठोकली आहे. या भागात केलेलं काम, स्वत:बद्दलची माहिती, प्रभागातले महत्त्वाचे फोन नंबर्स आमि मतदारांच्या यादीची लिंक त्यांनी अॅपमध्ये दिली आहे.
व्हॉट्सऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून या अॅपचा प्रचार सुरू आहे. एखाद्या उमेदवाराने फक्त एका प्रभागासाठी प्रचार अॅप बनवल्याची नागपुरातली ही पहिलीच वेळ आहे. जग डिजिटल झालं आहे. त्यामुऴे उमेदवारांनीही स्वत:ला बदलवून घेतलं आहे.
पाहा व्हिडिओ