पबमध्ये हाणामारी... दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी
पबमध्ये झालेल्या वादात एका 22 वर्षीय तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीय. शुभम महाकाळकर असं मृत तरूणाचं नाव आहे. तर पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन तरूण मुलांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय.
जितेंद्र शिंगाडे, नागपूर : पबमध्ये झालेल्या वादात एका 22 वर्षीय तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीय. शुभम महाकाळकर असं मृत तरूणाचं नाव आहे. तर पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन तरूण मुलांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय.
नागपूरमध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाने पबमध्ये राडा केला. या राड्यात आमदार पुत्राचाच मित्र ठार झाल्याची घटना घडलीय. नागपूरच्या शंकर नगर चौकात 'क्लाऊड सेव्हन' हा पब आहे.
काय घडलं नेमकं....
या पबमध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष आपल्या 6 ते 7 मित्रांसह गेला होता. बिल देताना झालेल्या भांडणात अभिलाष आणि पब कर्मचाऱ्यांत जोरदार हाणामारी झाली. यात पब चालकाचा मुलगा जखमी झाला. पबमध्ये झालेल्या भांडणाची माहिती अभिलाष याने आपला लहान भाऊ रोहीतला दिली.
रोहीत हा त्याच्या इतर मित्रांसह तिथे दाखल झाला. त्यात या घटनेतला मृत शुभमचाही समावेश होता. त्याच वेळी बारमध्ये आलेल्या बारमालकाच्या 15 ते 20 साथीदारांनी या युवकांवर हल्ला केला. इतर रोहीत खोपडेसह इतर तरूण पळून गेले. पण हल्लेखोरांच्या हाती शुभम आणि अक्षय खंडारे सापडले. तीक्ष्ण हत्यारांनी केलेल्या या हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कृष्णा खोपडेंच्या मुलाविरोधात तोडफोड आणि खुनाच्या प्रयत्नाचा तर बारमालकावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय, अशी माहिती क्राईम डीसीपी रंजन कुमार शर्मा यांनी दिलीय.
शुभम हा बीएससी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. शुभमचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो 26 जानेवारीला दिल्लीच्या राजपथावरील परडेच्या लेझीम पथकातही सहभागी झाला होता.
नागपूर शहरातील अत्यंत व्हीआयपी मानल्या गेलेल्या धरमपेठ आणि शंकन नगर परिसरात झालेल्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय.