जालना :  सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला आहे. पुण्याहून वर्ध्याकडे जात असताना जालना जिल्ह्यात रस्त्यावर दुचाकीमध्ये आल्याने हा अपघात घडला. दुचाकी स्वाराला वाचवताना, सिंधुताईंची गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुदैवाने या अपघातात, दुचाकी चालक तसेच सिंधुताईंच्या गाडीतील कुणालाही इजा झाली नाही. सिंधुताईंचीही प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी पाच वाजता ही घटना घडली.


सिंधुताई सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी रस्त्यांवरून टोलनाका धारकांना चांगलंच खडसावलं होतं, यावेळी सिंधुताई यांनी रस्त्यांवरील अपघातांविषयी चिंता व्यक्त केली होती.


सिंधुताई सपकाळ यांना असंख्य अनाथ मुलांची आई अर्थात माई म्हणून ओळखलं जातं. 


आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल दऱ्यात वसतीगृह सुरु केले. आज बऱ्याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहेत.