जय वाघाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना
नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड क-हांड अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या जय वाघाच्या तपासासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड क-हांड अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या जय वाघाच्या तपासासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून वन मंत्रालयानं विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना केली आहे.
या एसआयटीचं तीन सदस्यीय पथक नागपुरात दाखल झालं असून त्यांनी तपासही सुरु केला आहे. उमरेड क-हांड अभयारण्यात वावर असलेला जय वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. देशातला सर्वात मोठा वाघ अशी ख्याती असलेल्या जयचं दर्शन घडावं, यासाठी देशविदेशातून वन्यजीवप्रेमी आणि पर्यटक उमरेड क-हांड अभयारण्याला आवर्जून भेट द्यायचे.