लोणावळा दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास करणार एसआयटी
शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोणावळा : शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक यांनी हे आदेश दिले आहेत. महिन्याभरापूर्वी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या सार्थक वाघचौरे आणि श्रती डुंबरे यांचा मृतदेह भूशी डॅमजवळ आढळला होता. या दोघांचे मृतदेह विवस्त्र आणि छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले होते.
शवविच्छेदन अहवालानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र या दोघांची हत्या कुणी केली याचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिसांना या दोघांच्या मारेक-यांना शोधण्यात महिन्यभरानंतरही यश आलेलं नसल्याने सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होतोय.
सार्थक आणि श्रृती यांचे कुटुंबीय तसंच मित्रांनी तपासावर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ कायम आहे.