मालेगाव : मालेगाव-सटाणा रस्त्यावर दाभाडी जवळ अँपेरिक्षा-आणि इंडिका कारमध्ये  झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर सहा ते सात जण जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासी घेऊन अँपेरिक्षा मालेगावकडे येत असतांना इंडिका कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात समोरुन येणा-या अँपेरिक्षावर जाऊन धडकून हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये 1 महिला दोन लहान मुल 3 पुरषांचा समावेश आहे. जखमींवर सामान्य रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.