नागपूरमध्ये सहा महिलांचा बुडून मृत्यू
नागपुरच्या हिंगणा तालुक्यातील देवळी सावली मध्ये नदीत बुडून 6 महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीये.
नागपूर : नागपुरच्या हिंगणा तालुक्यातील देवळी सावली मध्ये नदीत बुडून 6 महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीये.
या सर्व महिला नदीत हरितालिका पुजनासाठी गेल्या होत्या. यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत 6 महिलांचा मृत्यू झाला.
मंदाताई नागोसे, प्रिया राऊत जान्हवी चौधरी, पुजा दादमल, पुनम दादमल, प्रणाली राऊत अशी मृत महिलांची नावे आहेत.