केंद्रीय बजेटकडून शेतकऱ्यांना सर्वाधिक अपेक्षा
केंद्रीय बजेट जवळ येत आहे. या बजेट कडून संपूर्ण देशात सर्वाधिक अपेक्षा असतील तर त्या शेतकऱ्यांना आहेत.
धुळे : केंद्रीय बजेट जवळ येत आहे. या बजेट कडून संपूर्ण देशात सर्वाधिक अपेक्षा असतील तर त्या शेतकऱ्यांना आहेत. गेली काही महिने पंतप्रधान मोदी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला.
हा फटका शेतकऱ्यांनी सहनही केला. आता मात्र मोदी सरकारने शेतक-यांसाठी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ठोस निर्णय घेण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बहुतेक शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा आहे.
अनेक शेतकऱ्यांना मार्च महिनाअखेर कर्ज भरणा करण्यास अडचणी येणार आहेत. यानंतर अनेक वेळा शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठीही जिल्हा बँकांकडे कॅश उपलब्ध नसल्याच्या तक्रारी होत होत्या, ती तीव्रता या वर्षी आणखी वाढण्याची शक्यता आहे.