सोलापूर : महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे सदस्य एकमेकांना भिडले. एवढंच नव्हे तर थेट खुर्च्याच एकमेकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. यामुळं बैठकीत मोठा गोंधळ उडाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि काँग्रेसचे सदस्य एकमेकांच्या मागे धावू लागले. गल्लीतल्या भांडणालाही लाजवेल असा प्रकार या बैठकीत पाहायला मिळाला. 


या सभे निलंबित वाहक जितेंद्र मोरे यास कामावर घेण्यावरून गोंधळ सुरु झाला. काँग्रेसचे शिवाजी मग्रुमखाने आणि भाजपचे अनंत धुम्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळं गोंधळात भर पडली.