मुंबई : 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' मधील सचिन खेडेकरांचा 'अभिमान आहे मला मी घाटी असल्याचा!' हा डायलॉग तुम्हाला आठवतोय का? मात्र घाटी हा शब्द महाराष्ट्रातील काही लोकांना अपमानास्पद वाटू शकतो, असे उच्च न्यायालयाने म्हटलेय. दक्षिण मुंबईतील एका तरुणाच्या मुंबई पोलिसांसोबत नव्या वर्षाच्या रात्री घडलेल्या एका वादाच्या केससंदर्भात सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हे मत मांडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बादरी अय्यर याचा नववर्षाच्या रात्री कुलाबा पोलीस ठाण्यातील पोलिसांसोबत वाद झाला. याविरुद्ध त्याने पोलिसात एफआयआर दाखल केली. नववर्ष स्वागतासाठी गेलेल्या बादरीच्या मैत्रिणीच्या पोषाखासंदर्भात पोलिसांनी उलटसुलट वक्तव्य केल्याची तक्रार या तरुणाने दाखल केली होती. याप्रकरणावर सुनावणी करताना 'बादरी याने पोलिसांना 'घाटी' म्हटल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले'.


रणजीत मोरे आणि आणि व्ही एल अचलिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी दिली. या सुनावणीदरम्यान बादरीने 'घाटी' हा शब्द गरज नसताना का वापरला असा सवाल उपस्थित केला. बादरीच्या वकिलांनी मात्र बादरीने मात्र हा शब्द स्वतःसाठी वापरला होता, असे म्हटले. पण, त्यांचे म्हणणे फेटाळत 'घाटी' हा शब्द काही महाराष्ट्रीय लोकांना शिवी वाटू शकते, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.