`कमवा आणि शिका`चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी
महाराष्ट्र सरकारच्या `कमवा आणि शिका` योजनेचा ब्रॅंड अॅम्बॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झाला आहे.
पुणे : महाराष्ट्र सरकारच्या 'कमवा आणि शिका' योजनेचा ब्रॅंड अॅम्बॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झाला आहे.
पुण्यामध्ये चहाची गाडी चालवून सीए झालेला सोमनाथ गिरम हा त्यानं मिळवलेल्या भरीव यशामुळे प्रकाशझोतात आला होता. सोमनाथ गिरम मुळचा सोलापूर जिल्ह्यातला आहे.
गुरुवारी गावाकडे असताना अकलूज टेंभूर्णी रस्त्यावर त्याच्या गाडीला अपघात झाला. त्यात सोमनाथच्या मणक्याला जबर मार लागलाय. त्यामुळे त्याचा कमरेखालच्या भागाच्या संवेदना गेल्या आहेत.
सोमनाथ त्याच्यावर पुण्यातल्या संचेती रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र त्याचा खर्च मोठा असल्यानं, सरकारी मदतीची अपेक्षा सोमनाथच्या कुटुंबियांनी व्यक्त केलीय.