जळगाव / मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे आता नव्यानं अडचणीत आलेत ते जावयामुळं... जावयाच्या आलिशान गाडीमुळं खडसेंची डोकेदुखी वाढलीय. 


काय आहे हे गाडी पुराण... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएच १९ एक्यू ७८०० क्रमांकाची ही आलिशान लिमोझिन गाडी... ही गाडी आहे प्रांजल खेवलकर यांची... आता हे खेवलकर कोण? तर ते आहेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई... त्यांची ही परदेशी बनावटीची लिमोझीन गाडी अवैध असल्याचा आरोप केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी...


'आरटीओ'ही गोत्यात!


२७ फेब्रुवारी २०१२ रोजी जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात या गाडीची नोंद करण्यात आली. तिचा मूळ मालक हरयाणातल्या भिवारीला राहतो, त्याचं नाव प्रदीप रामचंदर थम्पी... जळगावात गाडीची फेरनोंद झाली ती लिमोजिन नावानं नाही, तर होंडाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 'सोनाटा' या इंडियन कंपनीच्या नावानं... जळगाव आरटीओनं गाडीची तपासणी न करताच, परवानगी दिली की काय? अशी शंका आता घेतली जातेय.


आधीच गजानन पाटील नावाच्या ओळखीच्या व्यक्तीला लाचखोरी प्रकरणी अटक झाल्यानं एकनाथ खडसे अडचणीत आलेत. त्यात जावयाच्या या लिमोझीननं गाडीचं प्रकरण... यामुळं खडसेंना ब्रेक लागलाय, एवढं नक्की...