नाशिक : भारतातील पहिली ग्लोबल वाईन मास्टर होण्याचा मान सोनल हॉलंड या मराठी महिलेला मिळाला आहे. वाईन एक्स्पर्ट असल्याचा जागतिक संकेत या पदवीने मिळतो. नुकत्याच पार पडलेल्या सुला फेस्ट मध्ये भारतीय वाईनचा दर्जा अधिक उंचावल्याचं तिचं म्हणणे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला आणि मद्यतज्ज्ञ  म्हणटलं कि पुरोगामी राज्यात थोडे खटकणारे विचार वाटतात... मात्र हि सोनाल आहे मुळची अकोल्याची. तीला महाविद्यालयापासूनच वाईन विषयी विशेष आकर्षण... वाइन बनविण्याची प्रक्रिया हे एकप्रकारे कला, विज्ञानाचा भाग आहे.  हि कला अवगत करण म्हणजेच मास्टर ऑफ वाइन होणे तसे खूपच अवघड.  ब्लाइंड टेस्टद्वारे वाइनच्या द्राक्षाची गुणवत्ता, वाइनची गुणवत्ता, निर्मिती कालावधी यासह अन्य अनेक बाबी ओळखाव्या लागतात. जगातील कुठल्या परिसरात  वाइन तयार झाली आहे याची अचूक माहिती द्यावी लागते. दहा वर्षे चिकाटीने सोनलनं हा प्रवास पूर्ण केला आणि तिला दोन महिन्यांपूर्वी  लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ वाइनतर्फे मास्टर ऑफ वाइन घोषित करण्यात आले.


भारतात वाइन या पेयाची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये 80 टक्के वाइन उद्योग असल्याने वाइन उद्योगाशी संबंधित तंत्रशुद्ध माहिती देण्यासाठी  नाशिकमध्येच वाइन स्कूल सुरू करण्याचा तीचा मानस आहे. 


वाइनची लोकप्रियता वाढण्यासोबत गुणवत्तादेखील वाढते आहे. परदेशात वाइन निर्यात वाढण्या बरोबरच भारतीय वाइनला आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळत आहेत. परकीयांनाही भारतीय वाइनची भुरळ पडते आहे. आता सोनिया सारख्या महिला या क्षेत्रात पुढे आल्यास  वाईन आणि वुमेन ही युरोपिय व्याख्या भारतीय संकल्पनेत रुजणार आहे.