नागपूर : विदर्भवादी नेते आणि महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. विदर्भ राज्य आघाडी असं या पक्षाचं नाव असणार आहे. विदर्भ राज्य आघाडीच्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये अणेंनी ही घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि काँग्रेस आमचे शत्रू क्रमांक एक आहेत. त्यांच्याकरता आमचं दार बंद असल्याचं अणेंनी स्पष्ट केलं आहे. येत्या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या नगर पालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचं अणे म्हणाले आहेत.


विदर्भाला समर्थन देणाऱ्या संस्था किंवा अन्य राजकीय पक्षांशी गरज पडल्यास जागा वाटप करू अशी प्रतिक्रिया अणेंनी दिली आहे.