दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
पुणे : फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दहावीची परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार आहे.
दहावीच्या वेळापत्रकामध्ये थोडे बदल करण्याचा निर्णय बोर्डानं घेतला आहे. सलग पेपर न ठेवता प्रत्येक पेपरमध्ये एक दिवसाची सुट्टी देण्यात आलीय. पहिल्या वेळापत्रकात तीन पेपर सलग ठेवल्यामुळे विद्यार्थी पालकांनी विरोध केला होता.
या वेबसाईटवर पाहा संपूर्ण वेळापत्रक
दहावीचं वेळापत्रक
http://www.timetableresults.in/mah-board/maharashtra-ssc-date-sheet/
बारावीचं वेळापत्रक
http://www.timetableresults.in/mah-board/maharashtra-hsc-date-sheet/