औरंगाबाद : औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळासमोर मोठा पेच निर्माण झालाय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनाअनुदानीत शाळांमधल्या शिक्षकांनी दहावी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातल्यानं तपासणीसाठी गेलेले हजारो पेपर बोर्डात परत आलेत. जोपर्यंत मागणया मान्य करीत नाही तोपर्यंत पेपर न तपासण्याचा निर्णय या शाळांतील शिक्षकांनी घेतल्यानं बोर्ड अडचणीत आलंय. 


सध्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात सगळीकडेच उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडलेत.. परिक्षा संपल्यानंतर 45 दिवसांत निकाल लावावा लागतो. त्यामुळं औरंगाबाद विभागाचा निकाल वेळेवर लागेल की नाही असा पेच निर्माण झालाय... 


यावर तोडगा निघेल आणि निकाल वेळेवर लागेल असा विश्वास बोर्डाच्या अध्यक्षांनी जरी व्यक्त केला असला तरी सर्वच विषयांचे पेपर परत आल्यानं आता नवे शिक्षक शोधणं आणि मॉडरेटर शोधणं म्हणजे बोर्डासाठी तारेवरची कसरत झालीये...