मुंबई : एसटी कर्मचा-यांना बाप्पा पावला असंच म्हणावं लागणार आहे. एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे कर्मचा-यांचा महागाई भत्ता 119 वरून 125 टक्के इतका होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जानेवारी ते ऑगस्ट 2016 या महिन्यातील महागाई भत्त्याच्या थकबाकी रकमेपैकी 25 टक्के रक्कम ऑगस्ट 2016 च्या वेतनात रोखीने दिली जाणार आहे. महागाई भत्त्याची वाढीव रक्कम सप्टेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने दिली जाईल.