मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याच्या प्रस्तावाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. एसटीच्या स्थापनेपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला गणवेश इतक्या वर्षानंतरही बदललेला नाही. याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याविषयी एसटी महामंडळात गेले काही दिवस चर्चा सुरू होती. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अखेर त्यासाठी परवानगी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’च्या डिझायनर्सनी गेले सहा महिने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आधुनिक, विविध हवामानांना अनुकूल अशी तीन डिझाइन्स तयार केली आहेत. एसटी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमोर या डिझाइन्सचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रतिनिधींतर्फे काही बदल सुचवण्यात आले. यामध्ये चालक आणि वाहकांच्या गणवेशाचा रंग खाकीच हवा असून त्यात पोलिसांच्या गणवेशापेक्षा वेगळेपण अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.


कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधीही या नवीन बदलावर खूष असल्याचे दिसत आहे.