कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : राजकारण हा स्थायी भाव असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आता पुन्हा राजकीय घडामोडीना वेग आलाय. महापौर निवडणुकीमध्ये बॅकफूटला गेलेले शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी तिजोरीच्या चाव्या आपल्याच गटाकडे राहावे या साठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय. तर आमदार महेश लांडगे यांनी ही स्थायी सहजासहजी जगताप गटाकडे जाऊ नये या साठी प्रयत्न सुरु केलेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधारी गटनेतेपद आणि महापौरपद ही दोन्ही पदे स्वतःच्या मतदारसंघात म्हणजेच भोसरीमध्ये खेचत आणत आमदार महेश लांडगे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी मारली. पण महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या चिंचवड मतदार संघात म्हणजेच स्वतःच्या गटाकडं ठेवण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार मोर्चेबांधणी केलीय. जगताप यांच्या गटाकडून 


यांचे नाव चर्चेत....


 हर्षल ढोरे, माई ढोरे, चंदा लोखंडे, चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, आशा शेंडगे आणि सीमा सावळे यांची नावे चर्चेत आहेत... 
तर महेश लांडगे गटाकडून कुंदन गायकवाड, विलास मडेगिरी, नम्रता लोंढे, विकास डोळे आणि भीमा बाई फुगे 



अंतर्गत कलह नसल्याचा दावा भाजपने कितीही केला तरी विविध पदांवरून सुरू असलेला कलह लपून राहीलेला नाही.  त्यामुळं स्थायी समिती अध्यक्ष पदावरून ही हा संघर्ष कायम राहणार हे उघड गुपित आहे..