राज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे
राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.
नाशिक : राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.
बुधवारी सकाळपासून आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये दाखल झालं होतं. नाशिकमधील एका बड्या व्यावसायिकाच्या 9 वेगवेगळ्या ठिकाणांवरही चौकशी करण्यात आलीय. तर उर्वरित दोन व्यवसायिकांची रुटीन चौकशी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
नोटा बंदीचा निर्णय जाहीर झालायानातर किती प्रमाणत विक्री झाली त्यातून त्याचा ताळेबंद आयकर विभागाकडून तपासण्यात येतोय. दुकानात असलेला स्टॉक आणि विक्री झालेला स्टॉक याचा हिशोब तपासला जातोय.