रायगड : अलिबाग ते रेवस मार्गाची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रचंड शारीरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी अखेर रास्तारोको केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबागच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परीणाम होतोय. बांधकाम खात्याकडे वारंवार विनंती आणि आंदोलनं करूनही काही उपयोग होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी अखेर रास्तारोको केला. आरसीएफ कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती.


या आंदोलनाचा मुंबई ते मांडवादरम्यान प्रवासी जलवाहूतक सेवेवरही परीणाम झाला. ही बोटसेवा बंद ठेवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि येत्या 15 मे पासून रस्त्यांच्या कामाला सुरूवात करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.