शिर्डी : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील केळवाडी गावाला दुपारच्या सुमारास, वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसानं झोडपलं. बोटा, अकलापूर, माळवाडी, आंबी दुमाला या गावांना पावसाचा तडाखा बसला. या पावसामुळे डाळींब, द्राक्षाच्या बागा आणि कांदा पिकांचे मोठं नुकसान झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पावसाने अनेक शेतक-यांच्या उभ्या फळबागांमधील फळे गळून गेली. केळवाडी इथल्या बबन कुऱ्हाडे यांच्या शेतात असलेल्या अर्ध्या भरलेल्या शेत तळ्यातील प्लॅस्टिक वादळी वाऱ्याने फाटल्याने सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. 


या पावसाने कु-हाडे द-यातील मोठा तलाव पूर्ण भरला. सर्व लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागलेत. त्यामुळे इथला रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झालीय. दोन तास पावसाचा धूमाकूळ सुरु होता.