वसई : मिरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे महापौर चषकाचं आयोजन करण्यात आलं असून यानिमित्तानं पहिल्या दिवशी सूर्यकुंभ उपक्रम राबवण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या उपक्रमात 7 हजार 438 विद्यार्थ्यांनी सोलर कुकरच्या सहाय्यानं मॅगी शिजवली. या उपक्रमाची गिनीज बुक आणि लिम्का बुकमध्ये नोंद करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. 


सूर्यकुंभ उपक्रमात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरही सहभागी झाले होते. निसर्ग संवर्धनासाठी सौरउर्जेचा वापर करणं गरजेचं असल्याचं मत यावेळी डॉ. अनिल काकोडकरांनी व्यक्त केलं.