पुणे : खासगी क्लासच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर मिस झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. केवळ चुकीच्या वेळापत्रकामुळे ३० ते ३२ विद्यार्थ्यांना शेवटच्या भूगोलाच्या पेपरला मुकावं लागलय. आता या विद्यार्थ्यांना तत्काळ पुनर्परीक्षेची संधी मिळावी तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान विद्यार्थ्यांना चुकीचं वेळापत्रक वाटणारा क्लास चालक पसार असून शाळेनंही हात वर केले आहेत. अगदी असाच प्रकार तिकडे पालघरमध्येही पुढे आलाय. पालघर ३० ते ३५ विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपवर मेजेसवरून आलेल्या माहितीमुळे पेपरची वेळ चुकलीय. काल बारावीच्या भूगोलाचा पेपर दुपारी ११ वाजता होता. मात्र काही विद्यार्थ्यांना कोणीतरी व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेल्या वेळापत्रकात त्याची वेळ दुपारी ३ची होती.


त्यामुळे शहरातल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालय असलेल्या परीक्षा केंद्रावर हे विद्यार्थी वेळवर पोहोचलेच नाहीत. त्यामुळे त्यांना या पेपरला मुकावं लागलंय. या मुलांना भूगोलाचा पेपर ३ ते ६ होणार असल्याचे मेसज आले. त्याची कुठलीही खातरजमा न करता मुलांनी थेट ३ वाजता परीक्षा केंद्र गाठलं. त्यावेळी परीक्षेचा काळ उलटल्याचं समोर आलं.