नवी मुंबई : डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सुधीर सूर्यवंशी हल्ला प्रकरणाची चौकशी आता कोर्टाने क्राईम ब्रॉचकडे दिली आहे, यामुळे या प्रकरणामागे कोण आहे, हे समोर येण्यास मदत होणार आहे. तसेच या हल्ल्यातील आरोपींच्या पोलीस कोठडीत कोर्टाने आणखी २ दिवसांची वाढ केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारघर पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी कोर्टाने काढून क्राईम ब्राँचकडे दिली आहे. यामुळे या हल्ल्यामागे पनवेलमधील कुणी राजकीय व्यक्ती आहे का?, या हल्ल्यामागे नेमका काय उद्देश होता हे देखील समोर येणार आहे.


पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर रूग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत, त्याच्या हाताचं तसेच पायाचं हाड फ्रॅक्चर आहे. खारघरमध्ये ४ ते ५ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना जबर मारहाण केली होती. दरम्यान, आरोपींमध्ये मयूर ठाकूर हे आपले बंधू असल्याचे यापूर्वीच भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे. जी घटना घडली ती अयोग्य असल्याचंही प्रशांत ठाकूर यांनी म्हटलं आहे.