मुंबई : डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर खारघरमध्ये हल्ला करण्यात आला. यात सुधीर सूर्यवंशी यांना हॉकीस्टिकने जबर मारहणा करण्यात आली, यात त्यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे. सीसीटीव्हीत या हल्लाचा व्हिडीओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा जीवघेणा हल्ला असल्याचं स्पष्ट होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात नवी मुंबई पोलीस राजकीय दबावात असल्याचं सांगण्यात येत आहे, गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी हा दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे.


मात्र हा जीवघेणा हल्ला असूनही पोलिसांनी आरोपींवर ३०७ चा गुन्हा न दाखल करता, ३२६ चा गुन्हा दाखल केला आहे, यामुळे आरोपी यातून सहज सुटतील अशी चर्चा आहे. या प्रकऱणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं बोललं जात आहे.


या हल्ल्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निकटवर्तीयांची नावं समोर येत आहेत. मात्र पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने तपासातील अनेक तथ्य दडपण्याची शक्यता वाढली आहे.  या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे असलं तरी ते मीडियापर्यंत पोहचू नये याची खबरदारी घेतली जात असल्याची ही चर्चा आहे. 


या उलट पोलिसच प्रथम सीसीटीव्ही फुटेज दाखवतात, यामुळे आरोपींना ओळखणे आणि त्यांचा शोध घेणे अधिक सोपे होते, मात्र या प्रकरणात बोटचेपण्याचं धोरण नवी मुंबई पोलिसांनी घेतलं असल्याची चर्चा आहे.