पुणे : पुण्याच्या अभिजीत कटकेचं हिंदकेसरी होण्याचं स्वप्न अखेर अपूर्ण राहिलंय. हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या सुमित कुमारनं पटकावलाय. फायनलमध्ये सुमित कुमारनं अभिजीत कटकेला धोबीपछाड दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनलमध्ये सुरुवातीपासूनच सुमित कुमारचं वर्चस्व पाहायला मिळालं. अखेर दोन्ही फे-यांमध्ये वर्चस्व राखत सुमित कुमारनं अभिजीतला चीतपट केलं. अभिजीतला 2-9 ने असा पराभव स्वीकारावा लागलाय. अभिजीतचा पराभव झाल्यामुळे तमाम पुणेकरांसह महाराष्ट्राची निराशा झालीय.