पुणे : बहुचर्चित आणि बहुविवादीत अशा सनबर्न पार्टीचा सरकार दरबारातला मार्ग मोकळा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या प्रकरणी न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी परवानगी नसतानाही सनबर्न पार्टी आयोजित केल्याचा आरोप करणारी एक याचिका आहे. 


मात्र सनबर्नतर्फे नवीन वकील उभे करण्यात आले. म्हणून तांत्रिक अडचणींमुळे ही सुनावणी दुस-या न्यायमुर्तींमोर घेण्याचे आदेश, न्यायमुर्ती के के तातेड यांनी दिले. तर बेकायदा वृक्षतोड, बेकायदा उत्खनन याविरोधात तक्रार करुनही शासकीय अधिका-यांनी कारवाई केली नाही. 


डीजेमुळे होणारं ध्वनी प्रदुषण, फ्लाईंग झोन असलेलं पार्टीचं ठिकाण, तसंच पार्टी परिसरात कॉलेज, हॉस्पिटल आणि आश्रम आहेत. त्यामुळे महसूल, पोलीस, वन विभाग धिकारी आणि सनबर्न पार्टी आयोजकांवर कारवाईची मागणी करणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल आहे. त्यावर ३० डिसेंबरला सुनावणी होणार आहे. एकंदरीत न्यायालयात अजूनही सनबर्नचा फैसला होणे बाकी आहे.


सनबर्न फेसटिव्हल आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पुढली ५ वर्षं हा फेस्टिवल पुणे आणि राज्यातल्या इतरही भागांत होणार आहे. 


धक्कादायक म्हणजे या फेस्टिवलला राज्य सरकारतर्फे पर्यटन विभाग सहआयोजक आहे. त्यामुळे या फेस्टिवलला झुकतं माप दिलं जात असल्याचं बोललं जातंय. दरम्यान सनबर्नला विरोध करणाऱ्या डीजे वाल्यांनाही पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.