रोहा : काका आणि पुतण्यांमधला राजकीय वाद काही महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि त्यांचा पुतण्या संदीप तटकरेंमध्ये वाद पाहायला मिळाला. पण या वादामध्ये सुनिल तटकरेंचीच सरशी पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पोटफोडे अवघ्या सहा मतांनी विजयी झाले असून राज्यात या विजयाची चर्चा आहे. संतोष पोटफोडे 4354 आणि समीर शेडगे 4348 मते पडली. दोघांमध्ये फक्त सहा मतांचा फरक आहे. त्यामुळे आता अपक्ष समीर शेडगे यांनी केली फेरमतमोजणीची मागणी केली आहे.


सुनील तटकरेंचा पुतण्या संदीप तटकरेंना नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. ही उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी अर्ज भरला.